जीएसटीमुळे रेल्वे कॅन्टीनमधील पदार्थ महाग

मुंबई-ठाण्यातील चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांच्या पोटपूजेसाठी सोईच्या ठरणाऱ्या रेल्वे कॅन्टीनमधील आणि रेल्वे कॅटरिंगच्या खाद्यपदार्थं आता महाग झालेत.

Updated: Sep 13, 2017, 10:55 PM IST
जीएसटीमुळे रेल्वे कॅन्टीनमधील पदार्थ महाग  title=

मुंबई : मुंबई-ठाण्यातील चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांच्या पोटपूजेसाठी सोईच्या ठरणाऱ्या रेल्वे कॅन्टीनमधील आणि रेल्वे कॅटरिंगच्या खाद्यपदार्थं आता महाग झालेत. या खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू केल्यानं कॅन्टीनमधील सर्वच खाद्यपदार्थांचे दर आता किमान पंधरा रुपयांनी वाढले आहेत.

रेल्वेस्थानकातील कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांवर १२ टक्के तर, मेल-एक्‍स्प्रेसमधील स्वयंपाकगृहातील फिरत्या विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थांवर १८ टक्के जीएसटी लागू करण्यात आलाय. देशभरामध्ये १ जुलैपासून जीएसटी लागू करण्यात आला. त्यानंतर मध्य रेल्वेनं विशेष परिपत्रक काढून मुंबई विभागाअंतर्गत येणाऱ्या रेल्वेच्या सगळ्या उपहारगृहांमधील खाद्यपदार्थांवर जीएसटी लावणं बंधनकारक केलं.

रेल्वे स्थानकाबाहेर अवघ्या १० रुपयांना वडा पाव मिळत असताना रेल्वे कॅन्टीनमध्ये दोन छोट्या वड्यांसाठी १३ रुपये मोजावे लागत असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.