जेल प्रशासनाची कारवाई पूर्ण; आर्यनची अखेर सुटका

ड्रग्स प्रकरणी आर्यनला दिलासा, जामीन मिळाल्यानंतर अखेर जेलबाहेर...

Updated: Oct 30, 2021, 11:15 AM IST
जेल प्रशासनाची कारवाई पूर्ण; आर्यनची अखेर सुटका title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 26 दिवसांनंतर अखेर जेलमधून बाहेर निघाला आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती. पण सतत न्यायालयाकडून आर्यन आणि त्याच्या मित्रांचा जामीन अर्ज फेटाळला गेला. अखेर गुरूवारी झालेल्या सुनावणी दरम्यान आर्यन खान आणि अरबाज मर्चेंटला जामीन मंजूर झाला. त्यानंतर शुक्रवारी त्याची सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आज त्याची तुरूंगातून सुटका झाली. त्यामुळे मन्नतवर आनंदाचे वातावरण आहे. 

आज पहाटे आर्थर रोड कारागृहाची जामीन पेटी उघडण्यात आली. त्या पेटीत आर्यन खानचा अर्जही होता. त्यावर आज जेल प्रशासनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर आर्यन जेलमधून बाहेर आला आहे. आर्यन जेलमधून घरी आणण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता. जवळपास 26 दिवसांनंतर आर्यनला अखेर जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाकडून बऱ्याच युक्तीवादानंतर देण्यात आलेला हा निकाल शाहरुखला मोठा दिलासा देणारा ठरला.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकला त्या दिवसापासून शाहरुख सोशल मीडिया आणि मीडियापासून दूर होता. गुरूवारी आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुखचा वकिलांच्या टीमसोबत काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोवरून शाहरुखच्या आनंदाचा अंदाज लावता येतो.

आर्यनच्या सुटकेनंतर व्हायरल होत असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये शाहरुखसोबत वकिलांची संपूर्ण टीम दिसत आहे.  फोटोमध्ये सर्व दिग्गज वकील आहेत, ज्यांनी आर्यनची कोर्टात मांडण्यासाठी  प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर आर्यन आज तुरूंगातून बाहेर निघाला आहे.