मालिकेचं प्रमोशन करणं चॅनलला पडलं महागात, मुंबई पोलिसांपर्यंत तक्रार

प्रमोशनकरता उचललं 'हे' पाऊल 

Updated: Jul 11, 2020, 07:53 AM IST
मालिकेचं प्रमोशन करणं चॅनलला पडलं महागात, मुंबई पोलिसांपर्यंत तक्रार  title=

मुंबई : मुंबई पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे सध्या मुंबईकरांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस नागरिकांना सायबर गुन्हेगाराबाबत जनजागृती करीत '१४० किंवा ४० या क्रमाकांवरुन सुरू होणारे कॉल घेऊ नका. तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते', असे या व्हिडिओमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल मेगा माईक वरून घोषणा करताना दिसतो.

हा व्हिडिओ आणि त्याच सोबत व्हायरल झालेल्या मेसेजने मुंबईसह उपनगरात गोंधळाचे वातावरण पसरले होते. मात्र हा व्हिडिओ आणि मॅसेजमुळे लोकं पॅनिक झाल्यामुळे अखेर याची गंभीर दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने घेतली, त्यानंतर जे सत्य बाहेर आलं ते संतापजनक आहे.

सोनी लीववर लवकरच एक क्राइम थ्रिलर मालिका सुरू होत आहे. ज्याच्या प्रमोशनकरता मेकर्सने हा व्हिडिओ तयार केला आहे. यावर एका क्रमांकावरून फोन केला जात आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती सांगतोय की, त्याने हत्या होताना पाहिली आहे. तो खूप घाबरलेल्या अवस्थेत आहे. हा फोन काही विचारण्या अगोदरच कट होत आहे. 

क्रिएटिव प्रोड्युसर स्मृती किरणला असाच एक कॉल येतो. त्यांनी कॉल ऐकल्यावर ट्विट करून मुंबई पोलिसांना माहिती दिली. मात्र नंतर त्यांना कळलं की, हा कॉल खोटा असून प्रमोशन कॉल होता. त्यानंतर त्यांनी ट्विट करबन सोनी लिवला  खडेबोल सुनावले. 

हा व्हिडिओ सोनी लाईव्ह या वाहिनेने आपल्या नवीन येणाऱ्या एका सिरीयलचे प्रमोशन करण्यासाठी तयार केल्याचे कळते आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा मुंबई पोलिसांचा नसून सोनी लाईव्ह वाहिनेने तयार केला असून त्यांच्या प्रमोशनसाठी तो व्हायरल करण्यात आला असल्याची महिती समोर येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने या व्हिडीओ ची दखल घेतली आहे.