Ganeshotsav 2020 : पाहा भक्तांना सॅनिटाईज करणारा बाप्पा

गणेशोत्सवाच्या नवनवीन ट्रेंडमध्ये .... 

Updated: Aug 18, 2020, 03:15 PM IST
Ganeshotsav 2020 : पाहा भक्तांना सॅनिटाईज करणारा बाप्पा  title=

मुंबई : गणोशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच आता अनेकांना कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाची चिंता लागू राहिली आहे. गणपतीच्या दर्शनासाठी गेलं असतानाही मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर सर्वच गणेश भक्तांनी करावं असं आवाहन करण्यात येत आहे. असं असतानाच तुम्हाला खुद्द लाडक्या गणरायानंच सॅनिटाईज केलं तर? 

गणेशोत्सवाच्या नवनवीन ट्रेंडमध्ये यंदाच्या वर्षी अतिशय सुबक आणि तितकीच आरोग्यदायी, हितकारी अशी बाप्पाची मूर्ती भक्तांना सॅनिटाईज करण्यासाठी आणि कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. 

मुंबईतील घाटकोपरमध्ये असणाऱ्या साईनाथ नगर विभागात असलेल्या प्रांजल गणेश कला केंद्रातील मूर्तींमध्ये एका अनोख्या संकल्पनेची जोड देत खऱ्य़आखुऱ्या अर्थानं कोरोनावर मात करण्यासाठी हातभार लावणारा बाप्पा साकारण्यात आला आहे. या कला केंद्रात यंदाच्या वर्षी एलईडी लाईट्सच्या माध्यमातून गणेश मूर्तींवर सजावट करण्यात आली आहे. अतिशय सुंदर अशा या सजावटीसोबतच आणखी एक कल्पक संकल्पनाही येथे मूर्तीच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. 

गणपती बाप्पाच्या हातात असणारी आयुधं यंदा सॅनिटायझरने सुसज्ज असणार आहेत. कारण या चित्रशाळेतील मूर्तींच्या हातात असणाऱ्या आयुषधांमध्ये सॅनिटायझरचा स्प्रे बसवण्यात आला आहे. भाविक दर्शनासाठी बाप्पाच्या समोर येताच आयुधांतून त्यांच्यावर सॅनिटायझरची फवारणी केली जाईल अशी एकंदर रचना या मूर्तीमध्ये करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी या अतिशय वेगळ्या अशी गणेश मूर्तींना चांगली मागणी असून, एका वेगळ्या मार्गानं गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भाविकही पुढाकार घेताना दिसत आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x