मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका, प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट

संभाजी भिडेंच्या निकटवर्तीयानं मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचं आव्हान फेसबुकवर केल्याची धक्कादायक माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उघड केलीये.

Updated: Jan 10, 2018, 03:22 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका, प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  संभाजी भिडेंच्या निकटवर्तीयानं मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचं आव्हान फेसबुकवर केल्याची धक्कादायक माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उघड केलीये.

रावसाहेब पाटील असे त्याचे नाव आहे. ही माहिती पोलिसांना असूनही पोलिसांनी ती मुख्यमंत्र्यांपासून लपवली असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला.

हिंदुत्ववादी संघटनांमध्ये आता वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती पुण्याच्या पोलीस आयुक्तांना, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पुण्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांना आहे. मात्र त्यांनी ही माहिती मुख्यमंत्र्यांपासून लपवली आहे. या अधिकार्‍यांवर कारवाई करायला हवी, अशी मागणी आंबेडकरांनी यावेळी केली.