भीम कोरेगाव प्रकरणाचे मुंबईवर उमटले पडसाद, संपूर्ण प्रकरण

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

Updated: Jan 2, 2018, 08:35 PM IST
भीम कोरेगाव प्रकरणाचे मुंबईवर उमटले पडसाद, संपूर्ण प्रकरण  title=

मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेनं संयम बाळगावा असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे प्रकरण चिघळल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासन आणि गावकऱ्यांच्या भांडणातून हा प्रकार घडला आहे. भीमा कोरेगाव येथे जमलेल्या जमावार झालेल्या दगडफेकीनंतर राज्यभरात उमटलेल्या पडसादाच्या पार्श्वभूमिवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी प्रशासन आणि गावकरी यांच्यातील भांडणामुळे हा प्रकार घडला. जे लोक भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर आले होते त्याच्याशी या प्रकरणाचा काहीही संबंध नाही, असेही प्रकाश आंबेडकरांना या वेली सांगितले.

दरम्यान, 'घडलेल्या प्रकाराबद्दल राग तर आहेच. पण, कोणही कायदा सुव्यवस्था मोडून नये. राज्यात शांतता नांदली पाहिजे, असे अवाहन करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी उद्या (बुधवार) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.' राज्य सरकारने घडल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या हिंदूत्ववादी संघटनांना सहकार्य करणाऱ्या कोरेगाव ते शिरूर आणि कोरेगाव ते चाकण या परिसरातील गावांचे सरकारी अनुदान राज्य सरकारने दोन वर्षांसाठी बंद करावे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केली.