नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानकालगत झालेल्या हत्या प्रकरणातल्या आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. २२ वर्षीय अशफाक अली जावेद शेखला या प्रकरणी अटक केली आहे. लुटमारीच्या उद्देशानं त्यानं हत्या केल्याचं उघड झालं आहे. लुटमारीवेळी झालेल्या झटापटीत ३० वर्षीय विजय सुरेश मल्लेची हत्या झाली. गोवंडीत राहणारा विजय भंगार व्यायवसायिक होता. गुरूवारी सकाळी तो कामानिमित्त पनवेलला गेला, तो परतलाच नाही. त्याचा मृतदेह वाशी रेल्वे स्थानकालगतच्या झुडपांमध्य़े आढळला. परिसरातलं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.
तपासादरम्यान पोलिसांनी वाशी रेल्वे स्थानकातील तसेच आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासात, अशफाक शेख हा संशयास्पद आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याची माहिती काढून त्याला तो रहात असलेल्या मानखुर्दमधील साठेनगर येथून शनिवारी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्यानेच दारासिंगची हत्या केल्याची कबुली दिली.