पेट्रोल-डिझेल दरात कपात; जनतेला ९ पैशांचा दिलासा

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील दरही लवकरच कमी होण्यास सुरुवात होईल अशी आशा करायला हरकत नाही.

Updated: Jun 2, 2018, 11:45 AM IST
पेट्रोल-डिझेल दरात कपात; जनतेला ९ पैशांचा दिलासा title=

मुंबई: इंधन दरवाढीपासून सामान्यांना थोडासा दिसाला मिळालाय.  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ९ पैशांची घट झाली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत किंचीतशी कमी (९ पैसे) झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर हे ८६.१ रुपये प्रतिलीटर तर डिझेल ७३.५८ रुपये प्रतिलीटर असे झाले आहेत. दरम्यान, सतत वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेल दराला तब्बल सतराव्या दिवशी अल्पसा लगाम लागला होता. सतराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५९ पैशांनी स्वस्त झालं होतं. दरम्यान, पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरात ९ पैशांची कपात करत सरकारने जनतेला पुन्हा एकदा दिलासा दिला आहे.सततच्या दरवाढीने त्रासलेल्या सामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण आल्याने येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

दरवाढीने जनता हैराण

दरम्यान, दरवाढीनं जनता हैराण असली, तरी सरकार मात्र त्यावर काही ठोस पावलं उचलताना दिसत नाहीय. मंत्रिगट इंधन दरवाढीवर उपाय योजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलाय. हा मंत्रीगट लोकांचा मनस्ताप कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, इतकं उत्तर सध्या सरकारच्या वतीनं देण्यात येत आहे. 

जनतेचा आशावाद कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील दरही लवकरच कमी होण्यास सुरुवात होईल अशी आशा करायला हरकत नाही.