पतंगराव कदम यांचा अल्प परिचय

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचं आज रात्री निधन झालं आहे. गेल्या काही  महिन्यांपासून ते आजारी होते. मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 9, 2018, 11:42 PM IST
पतंगराव कदम यांचा अल्प परिचय title=

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचं आज रात्री निधन झालं आहे. गेल्या काही  महिन्यांपासून ते आजारी होते. मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काँग्रेसच्या कार्यकाळात त्यांनी अनेक वर्ष राज्यात मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. 

पलूस - कडेगावचे आमदार

सांगली जिल्हयातील ग्रामीण भागातील एका लहान शेतकरी कुटुंबात डॉ. पतंगराव यांचा जन्म झाला होता. पतंगराव कदम हे सांगली जिल्ह्यातल्या पलूस - कडेगावचे आमदार होते. काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी अनेक वर्ष राज्यात महसूल, मदत आणि पुनर्वसन, उद्योग, सहकार, वन, शिक्षण, या सारख्या विविध खात्यांचं मंत्रिपद म्हणून काम  पाहिले आहे. ते कॉंग्रेसचे जेष्ठ आणि ताकतवान नेते म्हणून  त्यांची  ओळख आहे. डॉ. कदम विधानसभेवर चार वेळा निवडून आलेत. ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व करत होते. 

सहकारी संस्थांचे संस्थापक

डॉ. कदम सोनहिरा सहकारी कारखाना लिमिटेड वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी व कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लिमिटेड पलूस, जि.सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड बँक अशा अनेक सहकारी संस्थांचे संस्थापक आहेत.

 भारती विद्यापीठाचे संस्थापक

वनमंत्री  डॉ पतंगराव कदम हे भारती विद्यापीठ अभिमत विश्वविध्यापिठाचे  संस्थापक आहेत. प्रशासनावर पकड, आणि तातडीने निर्णय घेणारे नेते अशी काम यांची ओळख होती. नवी दिल्ली आणि दुबई येथे त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि कॉम्प्युटर अॅप्लीकेशन यांची महाविद्यालये स्थापन केली आहेत. डॉ. पतंगराव कदम हे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे संस्थापक असून ते याचे संस्थापक-कुलगुरु देखील आहेत. भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी पुणे याच्या छत्राखाली देश व परदेशामध्ये १८० शैक्षणिक संस्था असून ही भारतातील नामवंत व अग्रेसर संस्थांपैकी एक आहेत.

दिलदार स्वभावाचा नेता

प्रेमळ मनाचा आणि दिलदार स्वभावाचा नेता अशी त्यांची ओळख, मंत्री पदावर असताना, कोणत्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता आला तरी त्याचे काम करणे, भेटायला आलेल्या सर्व लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन तात्काळ त्यांना मदत करणे, तातडीने निर्णय घेणे अशी त्यांची कामाची पद्धत. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि माजी मंत्री स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांचे कदम हे निकटवर्तीय होते.