ओव्हरहेड वायर तुटल्यानं हार्बर रेल्वे उशीरानं

 सध्या या ठिकाणी दुरूस्तीचं काम सुरू आहे.

Updated: Sep 3, 2018, 11:09 AM IST

मुंबई : वडाळा-कॉटन ग्रीन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक १५ मिनिटानं उशीरा धावत आहे. यामुळे सीएसटीएमकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झालायं. सध्या या ठिकाणी दुरूस्तीचं काम सुरू आहे. हे काम तातडीनं पूर्ण करण्याचा रेल्वेचे प्रयत्न आहे.

२ तासापासून वाहतूक ठप्प 

रविवारच्या सुट्टीनंतर आज मोठ्या प्रमाणात लोक कामाच्या निमित्तानं घराबाहेर पडले. दहीहंडी साजरी करण्यासाठीही मुंबईच्यादिशेने येणारी संख्या मोठ्या प्रमाणात असते. कॉटनग्रीन स्थानकाजवळ ही ओव्हरहेड वायर तुटली. अशावेळी ओव्हरहेड वायर तुटून झालेल्या खोळंब्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. यामुळे सीएसटीएमकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झालायं. गेल्या २ तासांपासून ही वाहतूक ठप्प आहे.