मुंबई : कर्जमाफीच्या मुद्द्यावर पहिल्याच दिवशी सरकरविरोधात विरोधीपक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारकडे कर्जदार शेतक-यांची यादी आहे. मग फॉर्म भरून घेण्याचा नवा उपक्रम सरकार कशासाठी घेतं आहे. यामाध्यमातून वेळकाढू करण्याचा सरकारचा हेतू आहे असा आरोप विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.
तर दुसरीकडे कारखान्याने शेतक-यांच्या नावावर परस्पर ३२८ कोटी पीककर्ज उचलल्याचा मुद्दा विधीमंडळात उचलण्यात येणार आहे. असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.