ऑनलाईन अपडेट, २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी

राज्यभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सुरू आहे. मात्र, राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे सर्वच प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. दुसऱ्या बाजूला दिवाळीचा मुहूर्त साधत कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा अश्वासन दिले आहे. या ठळक घटनांसह जाणून घ्या गेल्या २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी.

Updated: Oct 18, 2017, 05:38 PM IST
ऑनलाईन अपडेट, २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी  title=

मुंबई : राज्यभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सुरू आहे. मात्र, राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे सर्वच प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. दुसऱ्या बाजूला दिवाळीचा मुहूर्त साधत कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा अश्वासन दिले आहे. या ठळक घटनांसह जाणून घ्या गेल्या २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी.

  • दिवाळीच्या मूहुर्तावर पहिल्या दिवशी 8 लाख 40 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी. शेवटच्या पात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईपर्यंत योजना सुरू ठेवणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन... 

 

  • कर्जमाफीसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाचा निधी वळवला नाही, अर्थमंत्री मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण, पुण्याच्या उपमहापौरांच्या दाव्याला उत्तर

 

  • एसटी कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच.  बैठकांचं गुऱ्हाळ संपता संपेना. आंदोलनादरम्यान अकोल्यात एका एसटी वाहकाचा मृत्यू ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल.

 

  • नांदेड म्हणजे महाराष्ट्र नाही, ग्रामपंचायतीतल्या विजयानंतर नारायण राणेंची अशोक चव्हाणांवर टीका, सिंधुदुर्गात यापुढे भाजपसोबतच काम करणार... 

 

  • मुंबई महापालिकेत शिवसेना-मनसेमध्ये कायदेशीर लढा रंगण्याची चिन्हं. फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र करण्याची मनसेची मागणी, तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा शिवसेनाचा दावा... 

 

  • सोनपावलांनी आली दिवाळी, घरोघरी नरकचतुर्दशीचा उत्साह, दीपावली निमीत्त ठिकठिकाणी दिवाळी पहाटचं आयोजन, डोंबिवलीत नरक चतुर्दशीचं सेलिब्रेशन..

 

  • दिवाळीच्या निमित्त साईंच्या शिर्डीतही दिव्यांचा लखलखाट..  हजारो नंदादिपांनी साई नगरीचा आसमंत उजळला ..  

 

  • कोल्हापूरची स्मशानभूमी चितेऐवजी दिव्यांनी उजळली, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना आनंदाचे चार क्षण अनुभवण्यासाठी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचा उपक्रम...दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना दिल्या भेटवस्तू..