मुंबई : ओखी चक्रीवादाळामुळे मुंबई शहर तसेच उपनगरात पावसानं हजेरी लावली आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथमध्येही पाऊस बरसला. काही ठिकाणी पावसाची रिमझीम सुरूच आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ सहा किलोमीटर प्रतितास या वेगाने उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकत आहे. मुंबईपासून ते एक हजार किलोमीटर अंतरावर असून, वादळामुळे समुद्र खवळलेलाच राहणार आहे. त्यामुळे मुंबईसह ठाण्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
वादळामुळे आजही मुंबईसह कोकण किनारपट्टीत वाऱ्याचा वेग वाढणार आहे.. तसेच थंडीचं प्रमाण काही प्रमाणात कमी होऊन पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय..मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय.. दरम्यान, मुंबईला ‘ओखी’चा धोका लक्षात घेत, गिरगाव चौपाटीवर जीवरक्षकांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय...