प्लास्टिक बंदीला नवी मुंबई एपीएमसी प्रशासनाकडून केराची टोपली

प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक गोण्यांमध्येच भाजीपाला

Updated: Jun 24, 2018, 07:22 PM IST
प्लास्टिक बंदीला नवी मुंबई एपीएमसी प्रशासनाकडून केराची टोपली title=

मुंबई : राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला नवी मुंबई एपीएमसी प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. एपीएमसीत येणारा भाजीपाला नेहमीप्रमाणे प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक गोण्यांमध्येच आला. राज्य शासनाच्या आदेशानंतरही एपीएमसी प्रशासनाकडून योग्य ती पाऊलं उचलण्यात आली नाही. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना पर्यायी कुठल्या पिशव्यांचा वापर करायचा यासंदर्भाच सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये सर्रसपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसतो आहे.

प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर मुंबईत त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो आहे. मुंबईतील दादर मार्केट परिसरात खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. सकाळी सकाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या हातात कापडी पिशव्या पाहायला मिळतात. नागरिकांनी या प्लास्टिक बंदीचं स्वागत केलंय. मात्र कुठल्या गोष्टींवर बंदी यावरुन काही जणांमध्ये संभ्रम असल्याचेही दिसतंय. या प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.