ISIS संबंधित हालचालींचा सुगावा लागतात मुंबई, पुण्यात NIA चं धाडसत्र

Latest Update : राष्ट्रीय शोध पथक (NIA) आणि पुणे पोलिसांनी एकत्रितरित्या दोन्ही शहरांतील चार ठिकाणांवर धाड टाकत अतिशय महत्त्वाची कारवाई केली आहे. त्याबातच्या अपडेट्स एका क्लिकवर... 

सायली पाटील | Updated: Jul 3, 2023, 03:01 PM IST
ISIS संबंधित हालचालींचा सुगावा लागतात मुंबई, पुण्यात NIA चं धाडसत्र  title=
NIA Raid in Mumbai and Pune over isis suspisious activies

NIA Raids : राष्ट्रीय शोध पथक (NIA) आणि मुंबई पोलिसांनी सोमवारी मुंबई आणि पुण्यातील चार ठिकाणांवर धाड टाकण्यात आली. या कारवाईतून यंत्राणांनी मुस्लिम बहुल राष्ट्रांना समर्थन देणाऱ्या चौघांना ताब्यात घेतलं. या कारवाईनंतर समोर आलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्यांवर केंद्रीय यंत्रणा 2021 पासूनच पाळत ठेवून होत्या. 

दरम्यान, एनआयए आणि मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईत अनेक डिजिटल उपकरणं आणि इतर काही पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. 

पुण्यातील कोंढवा परिसरात असणाऱ्या वझीर कॅस्केड सोसायटीत टाकलेल्या धाडीमध्ये 39 वर्षीय झुबैर शेखला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आयसीसशी संबंध असण्याच्या संशयावरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून काही विद्युत उपकरणं हस्तगत करण्यात आली. 

दरम्यान सध्याच्या घडीला एनआयए आणि पोलीस यंत्रणांचं हे धाडसत्र अद्यापही सुरुच असून, प्रत्येक लहानमोठ्या हालचालीवरही लक्ष ठेवलं जात आहे. या कारवाईअंतर्गत नागपाडा पोलीस स्थानकाजवळही धाड टाकण्यात आली असून, तिथून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एनआयएशी संबंधित सुत्रांनी दिली. 

आयसीसच्या संपर्कात असल्याच्या संशयाच्या आधारे नागपाड्यातील काही रहिवाशांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त नागपाडाच नव्हे तर, सध्याच्या घडीला एनआयए आणि IB कडून राज्याच्या विविध भागांमध्ये धाड टाकली जात असून, राष्ट्रविरोधी कटकारस्थानांवर गुप्त माहितीच्या आधारे वचक बसणारी कारवाई करताना दिसत आहेत. 

(सविस्तर माहिती प्रतीक्षेत )