नीरव मोदीच्या स्थानिक मालमत्तेवर येतेय टाच

आतापर्यंत नीरव मोदीच्या मालकीच्या 523.72 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 24, 2018, 03:41 PM IST
नीरव मोदीच्या स्थानिक मालमत्तेवर येतेय टाच title=

मुंबई : नीरव मोदीनं केलेल्या बँकेतल्या अपहाराप्रकरणी ईडीनं प्रथमच नीरवच्या स्थावर मालमत्तेवरही टाच आणायला सुरूवात केलीय. आतापर्यंत नीरव मोदीच्या मालकीच्या 523.72 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. 

21 स्थावर मालमत्तांचा समावेश

त्यात 21 स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. त्यात प्रमुख्यानं मुंबई, पुण्यातली नीरवच्या मालकीची घरं, अहमदनगर जिल्ह्यातली 135 एकर जमीन, अलिबागमधील फार्म हाऊस आणि सोलर प्लाँटचा समावेश आहे. 

11 हजार 500 कोटींचा गंडा

याआधी ईडीनं नीरवच्या घरांमधून अनेक कपाट, घड्याळ्यांनी भरलेले खोके, आणि 9 आलिशान गाड्या, शेअर्स, बँक खाती असं सारं काही जप्त करण्यात आलंय. नीरव आणि त्याच्या मामा मेहूल चोकसीनं मिळून पंजाब नॅशनल बँकाला तब्बल 11 हजार 500 कोटींचा गंडा घातलाय.