नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड, विरोधकांचा सभात्याग

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची निवड 

Updated: Sep 8, 2020, 01:26 PM IST
नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड, विरोधकांचा सभात्याग title=

मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची निवड झाली आहे. या निवडणुकीला विरोधी पक्ष भाजपने आक्षेप घेतला होता. उच्च न्यायालयात उपसभापती पदाच्या निवडणूक विरोधात याचिका दाखल केली आहे, पुढील सुनावणी गुरुवारी आहे, तेव्हा निवडणूक घेऊ नये असं विधानपरिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी मागणी केली होती. सभापती रामराजे निंबाळकर यांनी उपसभापती पदाची निवडणूक पुकारली. त्यानंतर विरोधी पक्ष भाजपने सभात्याग केला. त्यामुळे उपसभपती पदी नीलम गोऱ्हे यांची एकमताने निवड झाली.

उपसभापती पदी नीलम गोऱ्हे यांची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. नीलम गोऱ्हे यांचा पायगुण चांगला असल्यानेच शिवसेनेची राज्यात सत्ता आली. उपसभापतीपदी निवड ही योग्यच असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीलम गोऱ्हे यांचं अभिनंदन केलं.

'हायकोर्टाने मला बोलावलेलं नाही. निवडणूक बोलावण्याचा अधिकार माझा आहे. इंटर्नल प्रोसिडिंगमध्ये हायकोर्टाला ज्यूरिडिक्शन नाही. त्यामुळे माझ्या अधिकारात निवडणूक घेण्याचा निर्णय कायम आहे.' असं सभापती यांनी म्हटलं.

बहुमताच्या जोरावर सभापतींनी उपसभापतीची निवडणूक घोषित केली. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत कोविड रुग्णांनी सभागृहात येऊ नये. तसेच वयोवृध्द आमदारांनी येऊ नये असे ठरविण्यात आले. पण आता तेच सभापती सभागृहात न येणाऱ्या आमदारांच्या हक्कांवर गदा आणत आहेत, असं दरेकरांनी यांनी म्हटलं आहे.