Ajit Pawar: आत्ताची मोठी बातमी! अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर जयंत पाटलांची मोठी कारवाई

Ajit Pawar, disqualification: अजित पवारांसह 9 आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jul 3, 2023, 01:00 AM IST
Ajit Pawar: आत्ताची मोठी बातमी! अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर जयंत पाटलांची मोठी कारवाई title=
Ajit Pawar, disqualification

Ajit Pawar, disqualification: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी बंडखोरी केली. अजित पवार आता शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्याचबरोबर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार आणि त्यांच्यासह शपथ घेतलेल्या नऊ आमदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

अजित पवारांसह 9 आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. पक्षाविरुद्ध पाऊल उचल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याचं जयंत पाटलांनी सांगितलंय. शरद पवार यांना कल्पना न देता पक्षाच्या धोरणाच्या विरोधी जाऊन शपथ घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. 

अजित पवार आणि 9 आमदारांवर जी कारवाई करण्यात येतीये ती कायदेशीर आहे. जे आमदार येतील त्यांना योग्य संधी देण्यात येईल. कारवाई होईल म्हणून काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. याविषयी निवडणूक आयोगाला माहिती दिली गेली असल्याचं देखील जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा - 'प्रेम कमी होणार नाही, माझ्या मनात...'; अजितदादांच्या बंडावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या

आमदार परत आले नाहीत तर नाईलाजाने कारवाई होईल. जितेंद्र आव्हाडांचा व्हिप सर्वांना लागू असेल. 5 जुलैला सर्वांना समजेल की किती जणं शरद पवारांच्या पाठिशी आहेत. अध्यक्षांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं, अशी मागणी देखील जयंत पाटील यांनी केली आहे.

शरद पवार काय म्हणाले?

अजित पवार यांनी सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली असं मी म्हणेल, असंही शरद पवार म्हणाले आहेत. माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नाही. सहकाऱ्यांची भूमिका येत्या 2 ते 3 दिवसात स्पष्ट होईल, असं शरद पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही, पण अजित पवार यांच्यासह इतर 9 जणांवर कारवाई होणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. पक्ष फुटला आणि घर फुटलं असं मी म्हणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. गेले त्यांची चिंता नाही. मात्र, मला त्यांच्या भवितव्याची चिंता नाही, असं म्हणत शरद पवार यांनी अजितदादा गटाला थेट इशारा दिला आहे.