ड्रग्ज तस्कर राहिल विश्रामला अटक, बॉलिवूडमधील काही स्टारसोबत थेट संबंध

ड्रग्ज तस्कर राहिल विश्रामला (Rahil Vishram) अटक करण्यात आली आहे. त्याचे बॉलिवूडमधील काही स्टारमंडळींसोबत थेट संबंध आहेत.  

Updated: Sep 18, 2020, 12:38 PM IST
ड्रग्ज तस्कर राहिल विश्रामला अटक, बॉलिवूडमधील काही स्टारसोबत थेट संबंध title=

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील (sushant singh rajput) ड्रग्ज कनेक्शनमध्ये आज मॅनेजर श्रुती मोदी आणि जया शहा यांची एनसीबीकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. दरम्यान, ड्रग तस्कर राहिल विश्रामला (Rahil Vishram) अटक करण्यात आली आहे. त्याचे बॉलिवूडमधील काही स्टारमंडळींसोबत थेट संबंध आहेत. त्यामुळे त्याच्या चौकशीत अधिक काय माहिती मिळेत, याकडे लक्ष लागले आहे. कोणाची नावे पुढे येतात याचीही उत्सुकता आहे.

सुशांतसिंह याच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगलचा तपास करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) तीन ड्रग स्मगलिंग टोळी उघडकीस आणल्या आहेत. यासह राहिल विश्राम या तस्करालाही अटक केली आहे. त्याच्याकडून १ किलो उच्च प्रतीची अमली पदार्थ आणि चार लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. राहिल शोविक आणि कैझान इब्राहिमशीही संबंधित आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रहिल विश्रामचे रिया चक्रवर्ती आणि अनुज केसवानी यांच्याशी थेट संबंध आहेत. ड्रग्स घेणाऱ्या बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांशीही त्याचा थेट संबंध आहे. राहुल विश्राम याचा सुशांत राजपूत प्रकरणाचा थेट संबंध सांगितला जात आहे. त्याच्याकडून 'मनाला क्रीम' नावाची एक किलो महाग औषधे देखील सापडली आहेत. एनसीबीने आणखी एक ड्रग पॅडलर तलवार याला ताब्यात घेतले आहे. ड्रग्ज प्रकरणातही तो महत्त्वपूर्ण खुलासे करण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ईडी चौकशीतून श्रुती मोदी आणि जया शाह यांची नावे पुढे आली होती. ड्रग्ज संदर्भात रियाने श्रृती आणि जयाला केलेले व्हाट्स अप चॅट उघड झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर एनसीबीकडून ही चौकशी होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच एनसीबीकडून आज तीन पथकांनी मिळून आणखी पाच संशयित ड्रग्ज पेडलर्सना ताब्यात घेण्यात आले. यात राहिल विश्राम याला अटक करण्यात आली. ज्याचा बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनशी थेट संबंध आहे. तसेच अनुज केसवानी, शौविक चक्रवर्ती आणि इब्राहीम यांच्याशी तो सतत संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.