जावई समीर खानच्या अटकनेनंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अटक

Updated: Jan 14, 2021, 11:39 AM IST
जावई समीर खानच्या अटकनेनंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया title=

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याच्यासह करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांना वैद्यकीय चाचणीसाठी रूग्णालयात नेण्यात आलं आहे. ड्रग्ज प्रकरणी या सर्वांना एनसीबीनं अटक केली आहे. करण सजनानीच्या चौकशीतून जावई समीर खानचं नाव समोर आलं. त्यानंतर त्याला काल चौकशीसाठी बोलावण्यात आलं आणि अटकही करण्यात आली. 

समीर खान आणि करण सजनानी यांच्यात 'गुगल पे'च्या माध्यमातून 20 हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान समीर खानच्या अटकनेनंतर नवाब मलिक यांनी ट्वीटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत ड्रग्ज प्रकरणात समीर खानच्या वांद्रेतील घरावर एनसीबीने छापा टाकला आहे. समीरच्या घरात एनसीबीकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ब्रिटिश नागरिक आणि ड्रग्ज सप्लायर करण सजनानी केसमध्ये समीर खानवर कारवाई झाली आहे. सजनानी आणि समीर मध्ये ड्रग्ज बाबतचा संवाद आणि पैशांची देवाण-घेवाणीचे पुरावे सापडले असल्याचं NCB च्या सुत्रांनी सांगितलं आहे. दोघांमध्ये 23 व्हॉट्स अप संवाद आहेत. काही गोपनीय मेसेज डिलीट केल्याचा संशय आहे. म्हणून फॉरेन्सिक लॅबकडे मोबाईल पाठवला जाणार आहे. समीर खान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचे जावई आहेत.