अडीच लाखांचे शूज, 50 लाखांचं घड्याळ? नवाब मलिक यांचे समीर वानखेडेंवर नवे आरोप

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे

Updated: Nov 2, 2021, 01:46 PM IST
अडीच लाखांचे शूज, 50 लाखांचं घड्याळ? नवाब मलिक यांचे समीर वानखेडेंवर नवे आरोप title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच आहे. आज नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केल आहे. 

समीर वानखेडे दररोज नवनविन कपडे घालून येतात. वानखेडे तर पंतप्रधान मोदींपेक्षाही पुढे गेले आहेत, पँट 1 लाख रुपयांची, बेल्ट 2 लाख रुपयांचा, अडीच लाख रुपयांचे शूज, घड्याळ 50 लाख रुपयांचं असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. याचे सर्व फोटो मी तुम्हाला उपलब्ध करुन देईन, या काळात समीर वानखेडे यांनी घातलेल्या कपड्यांची किंमत जवळपास 5 ते 10 करोड रुपये असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. एक इमानदार अधिकारी 10 कोटी रुपयांचे कपडे कसे काय घालू शकतो, असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. 

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे. मलिक यांनी केलेले आरोप म्हणजे निव्वळ अफवा आहेत, मलिक यांनी माहिती घेऊन बोलावं असं उत्तर समीर वानखेडे यांनी दिलं आहे.

तर या प्रकरणात समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडेही समीर यांची पाठराखण करण्यासाठी मैदानात उतरल्या. रोज उठून खोटे आरोप केले जात आहेत, तुम्ही कोण आहात, तुमचं डोक ठिकाणावर आहे का, आम्ही टॅक्स पेअर माणसं आहोत, तुमची मुलं आणि मुलींसारखं आम्ही दुबई लंडन इथं महागड्या गाड्यांमधून फिरत नाही, असा आरोप यास्मिन वानखेडे यांनी केला आहे. 

आमचा दिवाळीचा सण नवाब मलिक यांनी खराब केला, आमचा कुठल्याही ड्रग पेडल्सर किंवा व्यक्तीशी संबंध नाही, मी वकील आहे त्या संबंधीचे एखाद्या केस बद्दलचे whatsp चॅट मध्ये छेडछाड करून ते दाखवत आहेत, समीर वानखेडे लाखो रुपयेचे कपडे घालत नाहीत, नवाब मलिक आणि त्यांच्या जावया प्रमाणे आमच्याकडे लाखो रुपये नाहीत. समीर वानखेडे यांच्याकडे जे घड्याळ आहे ते सतरा वर्षापूर्वी आईने दिलेले घड्याळ आहे असं स्पष्टीकरण यास्मिन वानखेडे यांनी दिलं आहे.