नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय दिल्लीत होणार

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत भाजपाच्या दिल्ली इथे होणाऱ्या केंद्रीय पक्ष कार्यकारणी दरम्यान अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र भाजपाकडून या विषयांवर कोणीच बोलत नाही.

Updated: Sep 19, 2017, 12:20 PM IST
नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय दिल्लीत होणार title=

मुंबई :नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत भाजपाच्या दिल्ली इथे होणाऱ्या केंद्रीय पक्ष कार्यकारणी दरम्यान अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र भाजपाकडून या विषयांवर कोणीच बोलत नाही.

वरिष्ठ नेत्यांनी या विषयांवर कानावर हात ठेवले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह हेच अंतिम निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री यांचा राणे यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर अमित शाह लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक- एक जागा कशी अधिक करता येईल याचा विचार करत आहेत.

२४, २५ सप्टेंबरला भाजपची दिल्लीत कार्यकारणी आहे. तेव्हा राणे प्रवेशाच्या चर्चेबाबत अंतिम काय तो निर्णय होण्याची शक्यता आहे. तेव्हा राजकीय भूकंपाचे संकेत देणारे नारायण राणे बहुदा दिल्लीच्या बैठकीकडे डोळे लावून बसले असावेत अशी शक्यता आहे.