Monsoon : मुंबईसह या जिल्ह्यांत 3 ते 4 तासांत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Monsoon Update : मुंबई आणि कोकणासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 

Updated: Jul 1, 2022, 06:02 PM IST
Monsoon : मुंबईसह या जिल्ह्यांत 3 ते 4 तासांत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज title=

मुंबई : शहरातील विविध भागांमध्ये गुरुवारपासून जोरदार पाऊस बरसतोय. या पावसामुळे विविध भागात पाणी साचलं. मुंबईकरांना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तसेच काही वेळ उपनगरीय रेल्वेसेवाही विस्कळीत झाली. हा सर्व मनस्ताप सहन केल्यानंतर आता मुंबई आणि कोकणासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. (mumbai thane raigad and palghar districts are likely to receive heavy rains in next 3 4 hours imd forecast)

पुढील 3 ते 4 तासांत मुंबई, ठाण्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, ठाण्यासह रायगड आणि पालघरमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवमान विभागानं दिलाय. अनेक भागात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. कालपासून मुंबईसह उपनगरात पावसानं दमदार हजेरी लावलीय. आता पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज आहे.  

24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता 

मुंबईसह कोकणात येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.  तसंच पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट देण्यात आला आहे.  तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.