मुंबई-पुणे प्रवास फक्त 25 मिनिटात

मुंबई ते पुणे प्रवास आता झटक्यात

Updated: Jun 16, 2018, 08:51 PM IST
मुंबई-पुणे प्रवास फक्त 25 मिनिटात title=

मुंबई : देशात मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टवर काम सुरु झालं आहे. आता आणखी कमी वेळात पोहोचवणारं तंत्रज्ञान Hyperloop One सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे. मुंबई ते पुणे यांच्यामध्ये Hyperloop One ट्रेन सुरु करण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे तंत्रज्ञान पाहण्यासाठी अमेरिकेतील व्हर्जिन समूहाच्या प्रोजेक्टला भेट दिली. या Hyperloop चा अभ्यास आधी केला गेला आहे.

मुंबई-पुणे हा पूर्णपणे इलेक्ट्रिक मार्ग असेल. यामुळे दरवर्षी 1.5 लाख टन ग्रीन हाउस गॅस वातावरणात जाणार नाही. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करण्यात आलं की, Hyperloop मुळे मुंबई- पुणे प्रवास फक्त 25 मिनिटात पूर्ण होणार आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये मॅगनेटिक महाराष्ट्र कॉनक्लेव दरम्यान वर्जिन समुहाचे संस्थापक रिजर्ड ब्रांनसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  Hyperloop कराराबाबत घोषणा केली होती.