मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आज 2 तास बंद

दिशादर्शक फलकाच्या कामासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 2 तास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

Updated: Jan 31, 2019, 08:05 AM IST
मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आज 2 तास बंद  title=

मुंबई : मुंबई-पुणे महामार्ग दोन तास बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची दखल घ्या. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत हा महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका दोन तास बंद असेल अशी माहिती वाहतूक प्रशासनाकडून देण्यात आली. दिशादर्शक फलकाच्या कामासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 2 तास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

Image result for mumbai pune highway zee news

त्यामुळे मुंबई-पुणे असा नियमित प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागू शकतो. ज्यांना यावेळेला ही बातमी पोहोचली असेल ते पर्यायी मार्गाचा वापर करु शकतात. अशावेळी मुंबई-पुणे रेल्वे मार्गाला प्रवाशांची पसंती असेल. दिशादर्शक फलक लावताना मुंबई-पुणे मार्गिका बंद ठेवण्यात येईल त्यामुळे या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांना येथे थांबण्याची वेळ येऊ शकते. या सर्वाचा विचार करता 12 ते 2 या दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करता येऊ शकतो.