मुंबईची शान प्रीमियर पद्मिनी टॅक्सी इतिहासजमा होणार

आता मुंबईच्या रस्त्यांवर नाही धावणार पद्मिनी

Updated: Oct 12, 2019, 12:20 PM IST
मुंबईची शान प्रीमियर पद्मिनी टॅक्सी इतिहासजमा होणार title=

मुंबई : कधीकाळी मुंबईची शान समजली जाणारी प्रीमियर पद्मिनी टॅक्सी आता आपल्याला रस्त्यांवर धावताना दिसणार नाही. जून २०२० नंतर प्रीमियर पद्मिनी टॅक्सी रस्त्यांवर धावणार नाहीत. एकेकाळी भारतीय वाहन उद्योगाची शान असलेल्या प्रीमियर कंपनीने या गाडीची निर्मिती केली होती. मात्र २००० सालापासून कंपनी बंद पडल्यानंतर या गाड्यांची निर्मिती झालेली नाही. या टॅक्सी आता जुनाट झाल्या आहेत. त्यांची देखभाल अतिशय खर्चीक झाली आहे. त्यामुळे ही टॅक्सी ठेवणं परवडेनासं झालं आहे. त्यातच शान असली तरी या जुनाट टॅक्सीत प्रवास करणं मुंबईकरही टाळत आहेत. त्यामुळे अखेर या टॅक्सींना अलविदा करण्याचा निर्णय टॅक्सी संघटनेनं घेतला आहे.

१९६४ मध्ये मुंबईत दाखल

Fiat कारने १९६४ मध्ये Fiat 1100 डिलाइट कारच्या नावाने मुंबईत धावणं सुरु केलं. पण १९७४ मध्ये भारतीय राणी पद्मिनी यांच्या नावावरुन या टॅक्सीचं नाव प्रीमियर पद्मिनी केलं. ३० वर्ष ही टॅक्सी मुंबईत धावली. 

२०१३ मध्ये सरकारने प्रदुषणामुळे जुन्या गाड्या हटवण्यास सांगितले होते. त्यामुळे आता पद्मिनी कार लवकरच इतिहासजमा होणार आहे. पद्मिनी टॅक्सीच्या चालकांचं या गाडीसोबत जवळचं नातं होतं. त्यामुळे आता मुंबईत या टॅक्सीची कमतरता नक्कीच जाणवेल.