मुंबई : खादी वर्दीतील कलाकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला. खाकी वर्दीतल्या पोलीस उपनिरीक्षकाने बासरी वाजवली आहे. मुंबईकरांसाठी 'संडे स्ट्रीट' ही खास संकल्पना सुरू करण्यात आली.
त्याच अंतर्गत रफी अहमद किडवाई रोड इथं मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी बासरी वादनाचा आनंद लुटला. रफी अहमद किडवई मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब कुळे यांनी बासरीचं सुरेल वादन केलं.
बॉर्डर सिनेमातलं सुरेल गाणं बासरीवर वाजवून त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. दादासाहेब कुळे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.