घरफोड्या करुन मॉडेलिंग करणाऱ्या नेपाळी चोरास बेड्या

दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या नेपाळी घरफोड्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Updated: Oct 11, 2019, 05:53 PM IST
घरफोड्या करुन मॉडेलिंग करणाऱ्या नेपाळी चोरास बेड्या  title=

मुंबई : दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या नेपाळी घरफोड्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हा आरोपी 2010 जामिनावर सुटला होता. घरफोडी करून मिळवलेला पैसा तो मॉडेलिंगसाठी लागणारा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी वापरायचा. हा आरोपी नेपाळी नागरिक असून राहुल थापा असे त्याचे नाव आहे. मुंबई ठाणे पनवेल, न्हावाशेवा, उरण सारख्या परिसरात 30 घरफोड्या करणाऱ्या राहुल थापाला ऐरोली परिसरातून अटक केली आहे. 

राहुल थापाची मॉडेलिंगची आवडच त्याला महागात पडली. घरफोडी करणे हाच त्याचा व्यवसाय होता. यातून मिळालेला पैसा स्वतःचे पोर्टफोलिओ फोटोग्राफी करण्यास खर्च करीत होता .उंची कपडे घालून मोटारकार घेऊन मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उल्हासनगर सारख्या शहरात सीसीटीव्ही नसलेल्या आणि वयोवृद्ध  वॉचमन असलेल्या इमारतींची पाहणी करायचा. 

घरफोडी करण्यासाठी हा आरोपी नेहमी दुपारी 12 ते 4 हीच वेळ निवडायचा. राहुल थापा ऐरोली परिसरात पाहणी करण्यास येणार असल्याचे कळताच युनिट ३ ने सापळा रचून त्यास अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपीने 2007 ते 2008 या काळात पवई परिसरात तब्बल २० घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. 2011 अटक होऊन जामिनावर सुटल्यावर या आरोपीने पुन्हा मुंबईच्या बाहेर घरफोड्या करण्यास सुरुवात केली होती.