मुंबई : मनपाचे 23 शिक्षक आजपासून बेमुदत उपोषण सुरु करणार आहेत.
गेल्या 8 वर्षांपासून या शिक्षकांना वेतन नाही.. मनपाच्या लालफीतशाहीचा फटका या शिक्षकांना बसलाय. विविध खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळेतले हे शिक्षक आहेत. बीएमसीने या शाळांना शिक्षकांना रुजू करून घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं. त्यानुसार शाळांनी या 23 शिक्षकांना नोकरीवर घेतलं. मात्र नंतर बीएमसीने घुमजाव करत 2013 मध्ये चुकीची कारवाई झाल्याचं सांगत या शिक्षकांना कामावर घेता येणार नसल्याचं सांगितलं. यामुळे या सर्व शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय.
त्यावर न्यायालयाने अंतिम आदेश ऑक्टोबर 2016 मध्ये पारीत केले. त्यानंतर पुन्हा मनपाने न्यायालयाच्या आदेशांप्रमाणे सुनावणी घेऊन या पदांना मान्यता दिली. मात्र अजून त्यांचं वेतन वित्त विभागाच्या लालफितीत अडकलंय