मुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावं

Mumbai Metro 3 Station Name Change: मुंबई मेट्रो स्थानकाची नाव बदलण्यात आली आहे. सध्या पहिल्या टप्प्यातीलच मेट्रो सेवेच्या लोकार्पणाआधी मोठी बातमी समोर आली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 24, 2024, 09:56 AM IST
मुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावं title=
Mumbai News Today Centre approves new names for Mumbai Metro 3 11 stations

Mumbai Metro 3 Station Name Change:  मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. अंडरग्राउंड मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही अॅक्वालाइनचे ऑक्टोबरच्या सुरुवातीला लोकार्पण होऊ शकते. मात्र,  त्यापूर्वी मेट्रोसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मेट्रो 3मधील स्थानकांची नाव बदलण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मेट्रो 3 मार्गिकेवर एकूण 27 स्थानके आहेत. मात्र, सध्या पहिल्या टप्प्यातीलच मेट्रो सेवेचे लोकार्पण करण्यात येणा आहे. 

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान मेट्रो सेवेचे लोकार्पण होऊ शकते. पंतप्रधान मोदी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असून ही मार्गिका 12.5 किमी लांबीची आहे. यात 10 स्थानकांचा समावेश आहे. आता याच 10 स्थानकांची नावे बदलण्यात आली आहे. 

मेट्रो 3 मार्गिकेवरील एका स्थानकाचे नाव वांदे असं होतं. परंतु, ते स्थानक वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समध्ये असल्याने त्याचे नाव बदलून BKC वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स असं करण्यात आलं आहे. त्याचबरोबर आता इतर स्थानकांची नावंदेखील बदलण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. 

या स्थानकांची नावं बदलण्यात येणार 

1) सीएसएमटी मेट्रो- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो
2) मुंबई सेंट्रल मेट्रोः जग्गनाथ शंकर शेठ मेट्रो
3)सायन्स म्युझियमः सायन्स सेंटर
4) शितलादेवी टेंम्पलः शितला देवी मंदिर
5) विद्यानगरीः वांद्रे कॉलनी
6) सांताक्रुझः सांताक्रुझ मेट्रो
7) डोमेस्टीक एअरपोर्टः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ T1
8) सहार रोडः सहार रोड
9) इंटरनॅशनल एअरपोर्टः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-T2
10) एमआयडीसीः एमआयडीसी-अंधेरी
11) आरेः आरे जेव्हीएलआर 

दरम्यान, मेट्रो 3 मार्गिकेचे लोकार्पण झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही मार्गिका लोकांसाठी सेवेत येणार आहे. मेट्रो3चे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या टप्प्यातील स्थानके ही 22 ते 28 मीटर जमिनीखाली आहेत. मुंबई विमानतळाजवळील सहार रोड, टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 ही स्थानके सर्वात जास्त खोलीवर आहेत.