पहिलीपासूनच्या शाळा सुरु करा पण... टास्क फोर्सचा 'हा' महत्त्वाचा सल्ला

मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने अनुकुलता दाखवली आहे.

Updated: Nov 21, 2021, 06:56 PM IST
पहिलीपासूनच्या शाळा सुरु करा पण... टास्क फोर्सचा 'हा' महत्त्वाचा सल्ला title=

मुंबई : Mumbai School Reopening News : राज्यात कोरोनाचा आलेख कमी होत असून दैनंदिन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसांत सुरू होण्याचे संकेत मिळेत मिळत आहेत. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळेबाबत निर्णय होणार आहे. (School Reopening News in mumbai to reopen schools for classes 1 to 12)

मुंबई महापालिकेची अनुकूलता
मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने अनुकुलता दाखवली आहे.  १ ली ते ८ वी वर्ग सुरु करण्याकरता राज्य सरकारकडे मुंबई महापालिकेनं तयारी दर्शवलीय आहे. शाळा सुरु झाल्यानंतर कोविड रुग्णसंख्या वाढलीच तरी प्रशासन पूर्ण सक्षम आहे असे महापालिकेनं कळवलं आहे. 

अनलॉकनंतर, सार्वजनिक ठिकाणी गर्दीत लहान मुलांचा वावर वाढल्यानंतरही लहान मुलांमधील  कोविड केसेस नगण्य आहेत.  त्यामुळे,बगिचे, क्रिडांगणे ,बाजार,  याठिकाणी लहान मुलांचा वावर वाढला असताना शाळा सुरु करण्यास हरकत नाही, असं महापालिकेचं मत आहे.

टास्क फोर्सचा सल्ला
मात्र, कोविड टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार लहान मुलांचे लसिकरण सुरु करुन मगच शाळा सुरु कराव्यात असा आग्रह आहे.  अनेक महिने लहान मुलं शाळेत गेलेली नाहीत. त्यामुळे लहान मुलांचे लसिकरण लवकरात लवकर सुरु करुन मगच शाळा सुरु कराव्यात असा सल्ला टास्क फोर्सने  दिला आहे.

पालकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यात कोरोना संसर्ग कमी झाला असून जवळपास सर्वच गोष्टी सुरू झाल्या आहेत. शैक्षणिक संस्था देखील पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. पाचवीपासून पुढील वर्गांच्या शाळा - महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील पालकांनी मोठी मागणी केली असून ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. पहिली ते चौथीचे वर्गही लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी पालकांच्या एका गटाने केली आहे. पालकांच्या गटाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केलीय.