Metro Tickets: Whatsapp वर Hi पाठवा आणि मिळवा Metro चं तिकीट

Metro Tickets: मुंबईची लोकल (Mumbai Local) असो किंवा मेट्रो या वाहतुकीचा प्रवास करण्यासाठी तिकीट महत्त्वाचे असते. पण तिकीट काढायचं म्हटलं की तिकीट घरावरील लांबच्या लांब रांगा नजरेसमोर दिसते. मात्र आता तुमची या रांगेतून सुटका होणार आहे. कसं ते जाणून घ्या....  

Updated: Feb 14, 2023, 09:32 AM IST
Metro Tickets: Whatsapp वर Hi पाठवा आणि मिळवा Metro चं तिकीट title=
Mumbai Metro Tickets Can Now Be Booked On Whatsapp

Metro Tickets On Whatsapp : मुंबई मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडकीवर जावे लागते, रांगेत उभे रहावे लागते. आता मात्र तिकीट खिडकीवर न जाता, रांग न लावता व्हाट्सएपवर तिकीट उपलब्ध होणार आहे. प्रवाशांसाठी व्हॉट्सअपवर एक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

मुंबईत सध्या मेट्रो 1 (घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो 2 अ (अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व) व मेट्रो 7 (गुंदवली ते दहिसर पूर्व), या तीन मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. त्याखेरीज मोनो रेल्वेसेवाही सुरू आहे. उपनगरीय रेल्वेसेवांची माहिती देणाऱ्या 'यात्री' या अधिकृत अॅपवर आता मेट्रो आणि मोनो रेल्वेची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान प्रवाशांना आता मेट्रो 1 चे तिकीट व्हॉट्सअॅपचा वापर करून काढता येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना 967008889 वर साधा "Hi" पाठवावा लागेल. 24 नोव्हेंबर 2023 रोजी स्वयं-सेवा WhatsApp eTicketing लाँच करण्यात आले. 

WhatsApp वर ई-तिकीट कसे बुक करावे?

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मेट्रो तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना 9670008889 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप 'Hi' असे संदेश पाठवावे लागणार आहे. यानंतर, त्यांना एक ओटीपी मिळेल, ज्याचा वापर करून ते ई-तिकीट घेऊ शकतात. कंपनीने याचे वर्णन पेपर QR तिकिटाचा विस्तार म्हणून केले आहे. सध्या मुंबईतील प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

वाचा : खास शुभेच्छांसह प्रेमाचा दिवस असा करा खास 

मेट्रो कार्ड देखील Amazon Pay ने रिचार्ज केले जाऊ शकते

अलीकडेच दिल्ली मेट्रोने स्मार्ट कार्ड रिचार्जसाठी Amazon Pay सोबत हातमिळवणी केली आहे. आता पेटीएम व्यतिरिक्त, तुम्ही Amazon Pay द्वारे देखील तुमचे मेट्रो कार्ड रिचार्ज करू शकता. यासाठी तुमच्याकडे Amazon खाते असणे आवश्यक आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये पैसे ठेवावे लागतील. यानंतर, तुम्हाला Amazon Pay विभागात जाऊन बिल वर क्लिक करावे लागेल, जिथे मेट्रो रिचार्जचा पर्याय दिसेल. तुमचा मेट्रो स्मार्ट कार्ड क्रमांक येथे टाकून तुम्ही किमान रु. 100 पेक्षा जास्त रिचार्ज करू शकता.