Mumbai Mega Block: घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईत कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक?, ते जाणून घ्या

Sunday Mumbai Mega Block : मुंबईत रविवारी फिरण्याचा बेत आखात असाल तर मेगा ब्लॉक कुठे आहे ते जाणून घ्या आणि नंतरच प्रवास करा. अन्यथा प्रवासाला निघाल आणि तुमचा हिरमोड होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे ते पाहा.

Updated: Dec 18, 2022, 08:33 AM IST
Mumbai Mega Block: घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईत कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक?, ते जाणून घ्या title=
Mumbai Mega Block, Mumbai Local

Mumbai Mega Block : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी  मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेच्या दुसरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर लाईनवर हा ब्लॉक असणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असणार नाही. तर रात्री जम्बो  ब्लॉक असणार आहे. वसई रोड ते भाईंदर दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. ( Vasai Road – Bhayandar Up Fast Line and Down Fast Line (23.30 Hrs – 03.30 Hrs)

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा – मुलुंड दरम्यान

मध्य रेल्वेवर माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन स्लो मार्गावर (सकाळी 11.5) ते दुपारी 3.55) दुसरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या रेल्वे स्टेशनदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी मुंबईहून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 वाजेपर्यंत सुटणाऱ्या लोकल डाऊन धीम्या मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान थांबणाऱ्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत आणि त्यानंतर लोकल डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे गाड्या 15 मिनिटे उशीराने धावतील.

तसेच सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या लोकल अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबतील, पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील . 
 
हार्बर मार्गावर

पनवेल – वाशी अप आणि डाऊन हार्बर लाईन्स (सकाळी 11.5 ते दुपारी 4.5 (बेलापूर/नेरुळ – खारकोपर लाईन वगळून) मेगा ब्लॉक असणार आहे.

सकाळी  10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 9.45  ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ट्रान्स - हार्बर लाइन
ठाणे - पनवेल अप आणि डीएन ट्रान्सहार्बर लाईन (सकाळी 10.01 ते दुपारी 03.53 पर्यंत)

सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि पनवेलहून ठाण्याकडे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर लाईन सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी सेक्शनवर विशेष गाड्या धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

उरण लाइन
बेलापूर/नेरुळ - खारकोपर मार्गावरील सेवा ब्लॉक कालावधीत उपलब्ध असतील.