VIDEO : धक्कादायक ! AC Local चे दरवाजे उघडलेच नाही अन्...

Mumbai AC Local : मुंबईकरांचा प्रवास गारेगार व्हावा म्हणून AC Local सुरु करण्यात आली. पण या AC Local ने लोकल मुंबईकरांचा जीव वेठीस ठेवला. लोकलचे दरवाजे उघडायला मोटरमन विसरला की काय? या भीतीमध्ये मुंबईकरांना श्वास रोखला होता. 

Updated: Jan 10, 2023, 09:09 AM IST
VIDEO : धक्कादायक ! AC Local चे  दरवाजे उघडलेच नाही अन्... title=
Mumbai Local Train News AC Local were not opened Passengers directly reached Virar video viral on Social media marathi news

Mumbai Local Train News : मुंबईकरांसाठी (Railway Station in Mumbai) लोकल ही त्यांची लाइफलाइन...स्वस्ता आणि सगळ्यात फास्ट कुठेही पोहोचण्यासाठी मुंबईकर लोकलने प्रवास करतात. मुंबईकरांचा प्रवास गारेगार व्हावा म्हणून AC Local दाखल झाल्या खऱ्या...पण या एसी लोकलने मुंबईकरांचा जीव वेठीस ठेवला. मुंबईत एसी लोकलचे स्वयंचलित दरवाजे (AC local Doors) स्टेशनवर उघडलेच नाही, आता काय करायचं?  या भीतीने मुंबईकरांचा (Mumbai News)  श्वास कोंडला होता. द बर्न ट्रेनची घटना अनेकांना माहिती आहे. कुठल्याही स्टेशनवर रेल्वे न थांबता नो स्टॉप धावत होती. पण लोकल स्टेशनवर थांबते, प्रवाशांना उतरायचं आहे, पण हे काय दरवाजाच उतरत नाही...अरे देवा आता काय होणार...

प्रवाशांना नाहक मनस्ताप

ही घटना घडली आहे चर्चगेटवरुन विरारच्या एसी लोकलमध्ये (Churchgate Virar AC Local)...नालासोपारा (Nalasopara) स्टेशन आलं खरं पण एसी लोकलचे दरवाजे उघडायला मोटरमन विसरला की काय? यामुळे प्रवाशांना थेट विरार गाठावे लागले. या घटनेनंतर प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलं. तिचे दरवाजे उघडले न गेल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला हे असं पहिल्यांदा घडतंय, अशातलाही भाग नाही. याआधीही अशीच घटना घडलेली आहे. (Mumbai Local Train News AC Local were not opened Passengers directly reached Virar video viral on Social media marathi news)

मोटरमनला केलं केबिनमध्ये बंद

मुंबईकरांना झालेल्या या त्रासामुळे संतप्त प्रवाशांने मोटरमनला घेरलं. एवढंच नाही तर मुंबईकरांना नालासोपाऱ्याला उतरता आलं नाही.  म्हणून प्रवाशांनीही मोटरमनला केबिनमधून बाहेर येऊन दिलं नाही. प्रवाशांच्या एकाच गोंधळ्यामुळे विरार स्टेशनवरील वातावरण काही वेळासाठी तणावपूर्ण झालं होतं. या गोंधळामुळे इतर लोकल ट्रेनवरही परिणाम झाल्या. अनेक गाड्या या रखडल्या होत्या. एकंदरीतच काय या एका एसी लोकल ट्रेनमुळे अनेक मुंबईकरांना फटका बसला. ही घटना सोमवारी रात्री 11.30 वाजता घडली. या घटनेची रेल्वेनं दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे.

यापूर्वीही अशी घटना घडली, व्हिडीओ व्हायरल

मुंबईकरांसोबत ही पहिली घटना नाही यापूर्वी 27 जून 2022 घडली होती. त्यावेळी दादर रेल्वे स्ठानकावर उतरण्यासाठी प्रवासी दरवाजापाशी उभे होते मात्र त्यांना उतरता आले नाही. कारण एसी लोकलचे दरवाजेच उघडलेच नाही. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

उघड्या दरवाजांनी एसी लोकल धावली

तर त्यापेक्षा जास्त खतरनाक म्हणजे सप्टेंबर 2022 अंधेरी ते भाईंदर दरम्यान लोकल दरवाजे उघडे धावली होती. चर्चगेट ते विरार दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. यामुळे गर्दीच्या रेट्यामुळे दरवाजावरील रबर निसटल्याने एसीचे दरवाजे उघडेच राहिले होते.