मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करावी - आरोग्य मंत्री

मुंबईत आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई आणि  उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केली आहे. 

Updated: Jun 12, 2020, 08:07 AM IST
मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करावी - आरोग्य मंत्री title=

मुंबई : आरोग्य कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई आणि  उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केली आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा करण्याचे म्हटले होते. त्याबाबत केंद्राकडे मागणी करण्यात येईल,असेही नमुद केले होते.

काल राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल तसेच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी मुंबईत लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली.

कोरोना व्यतिरिक्त अन्य जे आजार आहेत क्षयरोग, पावसाळ्यात होणारे आजार, मलेरिया, डेंग्यू याच्या नियंत्रणासाठी राज्य शासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी लोकांनी स्वयंशिस्त पाळावी. मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, हात स्वच्छ धुवावेत आदी बाबी कटाक्षाने पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.