Lalbaug Murder : निदर्यपणाचा कळस! 'ती' टीव्ही मालिका पाहून पोटच्या लेकीने आईचे केले तुकडे....

Lalbaug Crime : गेले तीन महिने आईच्या मृतदेहासोबत ती घरात राहत होती. या घटनेने मुंबई हादरुन गेली. पोलिसांनी घर फोडलं आणि एकच खळबळ माजली. आतापर्यंत पोलिसांनी 6 जणांचा जबाब नोंदवला. त्यानंतर या हत्येमागील इनसाईड स्टोरी समोर आली आहे. 

Updated: Mar 18, 2023, 10:36 PM IST
Lalbaug Murder : निदर्यपणाचा कळस! 'ती' टीव्ही मालिका पाहून पोटच्या लेकीने आईचे केले तुकडे.... title=
Mumbai Lalbaug Murder police claims daughter got idea from crime patrol killed mother just chopped her body crime news in marathi

Mumbai Lalbaug Murder : अख्खा मुंबईला हादरवून सोडणाऱ्या लालबाग हत्याकांडमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. पोटच्या लेकीने आपल्या आईचीची निर्घृपणे हत्या केली. त्यानंतर तीन महिने हो तीन महिने ती त्या मृतदेहासोबत घरात राहत होती. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. मुलीने आईच्या मृतदेहाचे तुकडे करुन घरातील वेगवेगळ्या भागात ठेवले होते. नातेवाईकांनी आपली बहिण बेपत्ता आहे अशी तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलीस तिच्या घरी पोहोचले आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी मारेकरी मुलीला अटक केली आहे. आता या घटनेत तपास करत असताना धक्कादायक खुलासे होत आहेत. एका टीव्ही मालिकेतून कल्पना घेऊन तिने आईच्या मृतदेहाचे तुकडे केले. 

'त्या' मालिकेतून मिळाली आयडिया 

रिंपल जैने हिची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीस सूत्रानुसार रिंपल  नियमितपणे टीव्हीवर क्राईम पेट्रोल पाहत होती. याच एका मालिकेतील भागातून रिंपलला आईच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची आयडिया मिळाली.  इलेक्ट्रिक मार्बल कटर, कोयता आणि सुरीच्या मदतीने मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे केले. 

'मी आईची हत्या...'

आईची हत्या आपण केलं नसल्याचं पोलीस चौकशीत रिंपलने सांगितलं आहे. वीणा जैन यांची हत्याचा आरोप तिने फेटाळून लावला आहे. ती म्हणाली की ''26 डिसेंबरला तिची आई चाळीतील सार्वजनिक शौचालयात जात असताना पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडली. या घटनेत तिचा मृत्यू झाला. हे पाहून मी घाबरले कारण लोकांना वाटेल की, मीच आईची हत्या केली आहे. त्यामुळे मी आईच्या मृतदेह घरात नेला आणि नंतर त्याचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला.''

रिंपलने एकटीने मृतदेहाचे तुकडे...

पोलिसांना रिंपलच्या या उत्तरावर विश्वास नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यांचा मते रिंपलने एकट्याने मृतदेहाचे तुकडे करणं शक्य नाही. रिंपलने आईच्या धडाचा भाग कपाटातील प्लॅस्टिक पिशवीत ठेवला. हातपाय एका स्टीलच्या टाकीत ठेवलं. शरीराचे इतर भाग दोन ड्रम्समध्ये ठेवले. 

मृतदेहाच्या तुकड्यांमुळे बाथरुम तुंबलं

शरीराचे काही भाग तिने बाथरुममधून गटारात वाहून जातील असं समजून तिथे फेकले खरं...पण त्यामुळे बाथरुम पूर्णपणे तुंबले. त्यावेळी रिंपलने आपल्या प्रियकराला ड्रेन सक्शन पम्प आणायला सांगितला. या ड्रेन सक्शन पम्पने रिंपलने बाथरुम साफ केले. 

दुर्गंध कमी करण्यासाठी रिंपलने...

तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे आता इब्राहिम कासिम चाळीत दुर्गंधी सुटली होती. चाळीमधील लोकांना संशय येऊ नये आणि दुर्गंध चाळी पसरू नये म्हणून रिंपलने डोक लावलं. तिने अत्तराच्या 200 बाटल्या आणि एअर फ्रेशनर्सची मदत घेतली होती. 

अशी घटना उघड झाली...

झालं असं की, मंगळवारी 14 मार्च 2023 ला सकाळी रिंपलचे मामेबहिण तिच्या घरी आली होती. त्यावेळी रिंपलने तिला घरात घेतलं नाही. शिवाय अर्धच दरवाजा उघडून तिने मामाने घरखर्चासाठी पाठवलेले पैसे घेतले. रिंपलच्या वागण्यातून मामेबहिणीला संशय आला. तिने घरी जाऊन आपल्या वडिलांनी झालेल्या घटनेची माहिती दिली. मामालाही विचार पडला कारण गेल्या तीन महिन्यांपासून बहीण वीणा जैन यांनी त्यांचाशी संपर्क केला नव्हता. रिंपलला विचारल्यावर ते उडवाउडव करायची. 

त्यामुळे अखरे वीणा यांचे भाऊ सुरेशकुमार पोरवाल यांनी काळाचौकी पोलीस स्टेशन गाठले. झालेला प्रकार त्यांना सांगितला आणि आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार केली. या तक्रारीवरुन पोलीस आणि नातेवाईक वीणा जैन यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी आई झोपली आहे असं सांगत रिंपलेने दरवाजा उघडण्यास नकार दिला. पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी दार तोडले आणि घरात घुसले. अशाप्रकारे या धक्कादायक घटनेचा उलगडा झाला.  

6 जणांचा जबाब नोंदवला

मुंबई पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदवले आहेत. इब्राहिम कासम इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या हॉटेलमधील विक्रेते, सेल्समन आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली आहे. पोलीस सूत्रांनुसार हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने रिंपलने आई जेव्हा इमारतीतून खाली पडली तेव्हा मृतदेह घरी नेले होते. रिंपलने बारावीनंतर शिक्षण सोडले होते आणि 20 वर्षांपूर्वी त्याचा वडिलांचे निधन झाले होते.