मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध परळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा मंडळाच्या गणेशमूर्तीची उंची कमी करण्यात येणार आहे. दरवर्षी मंडळाकडून २३ फुटी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र, यंदा आम्ही केवळ तीन फुटांचीच मूर्ती घडवण्याचा निर्णय घेतल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या संकटात असा होणार मुंबईतला गणेशोत्सव
तसेच यंदा परळच्या राजाचे विसर्जनही कृत्रिम तलावात करण्यात येईल. तसेच 'श्रीं'च्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही. तसेच यंदा गणेशोत्सवासाठी विभागातील लोकांकडून वर्गणी न घेण्याचा निर्णयही राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.
Ganeshotsav 2020 : जीएसबी गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय ; पहिल्यांदाच असं होतंय की....
काही दिवसांपूर्वीच बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील गणेशोत्सव मंडळाना तशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. मुंबईतील मोठ्या मंडळांनी ( आर्थिकदृष्ट्या सक्षम) विभागीय वर्गणी घेऊ नये. पण केवळ वर्गणीवर अवलंबून असलेल्या मंडळांची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी या मंडळांनी आपापल्या विभागात स्वेच्छेने वर्गणी देण्याबाबत आव्हान करावे. मंडळांनी मंडप, रोषणाई तसेच डेकोरेशनवर होणार अतिरिक्त खर्च टाळावा. या खर्चातून आपल्या विभागातील निर्जंतुकीकरण, सुरक्षित वावर नियमावलीसह शक्य तितकी कोरोना प्रतिबंधित व्यवस्था करावी, अशा सूचना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मंडळांना दिल्या होत्या.