वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांचा मोठा आरोप, 'पोपट' पिंजऱ्यात गेला तर अनेक गुपिते उघड होतील!

 NCBचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे, असा आरोप राज्याचे  नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.  

Updated: Oct 29, 2021, 11:32 AM IST
वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांचा मोठा आरोप, 'पोपट' पिंजऱ्यात गेला तर अनेक गुपिते उघड होतील! title=
संग्रहित छाया

मुंबई :  Mumbai drugs bust case : ड्रग्ज प्रकरणाच्या माध्यमातून एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे, असा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. वानखेडे यांच्या मागे भाजप नेते उभे राहिलेत. महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या वानखेडे यांना निलंबित करुन जेलमध्ये टाकावे, अशी मागणी मलिक यांनी केली. तसेच हिवाळी अधिवेशनात मोठी नावं समोर येतील, असे मलिक यांनी यावेळी संकेत दिलेत.

मुंबईतील ड्रग्ज पार्टी (Mumbai drugs case) प्रकरणातील आणखी मोठी नावे पुढे येतील, असे मलिक यांनी म्हटले आहे. ड्रग्ज पार्टीत तो दाढीवाला कोण, असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला होता. आता तो दाढीवाला काशिफ खान असल्याचे पुढे आले आहे. काशिफ खान याचे सेक्स आणि ड्रग्ज रॅकेट आहे. काशिफ खान हा देशभरात फॅशन शो आयोजित करतो. त्यातून तो अमली पदार्थ आणि सेक्स रॅकेटचा मोठा व्यवसाय चालवत आहे. ड्रग्ज पार्टीच्यावेळी तो प्रेयसीसोबत क्रूझवर नाचताना दिसत आहे, अशी मी विचारणा केली. काशिफ खान आणि समीर वानखेडे यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे काशिफ खान याच्यावर कारवाई करण्यास वानखेडे यांनी रोखले, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
 
समीर वानखेडे यांच्याकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र रचले गेले. वानखेडे यांच्या मागे भाजप नेते उभे राहिले आहेत. मी म्हणतो, वानखेडे यांना निलंबित करुन जेलमध्ये टाकावे. हिवाळी अधिवेशनात मोठी नावं समोर येतील, असे सूचक वक्तव्यही मलिकांनी केले.

वानखेडे यांच्या कुटुंबीयांकडून मला टीव्हीवर धमकी देण्यात आली. मला मीडियाशी बोलण्यापासून रोखण्यासाठी ट्विटरवर काहीही लिहिण्यास बंदी घालण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. स्वतंत्र भारतात या अधिकाऱ्याला बोलण्यापासून रोखले जाईल असे वाटते का?  कालपर्यंत हा अधिकारी मुंबई पोलिसांकडे संरक्षण मागत होता आणि आज त्याच पोलिसांवरचा विश्वास उडाला? तो मराठी आहे असे लिहिले आहे, नवाब मलिक मराठी नाही का? पोपट पिंजऱ्यात गेला तर अनेक गुपिते उघड होतील, अशी भीती भाजपचे जे जीनी आहेत, त्यांना वाटत आहे.

दरम्यान, सुशांत सिंहच्या प्रकरणानंतर, संपूर्ण बॉलिवूड लोकांवर खटला चालला. कोणालाही अटक झाली नाही आणि खंडणीचा धंदा सुरू आहे. बॉलिवूडला बदनाम करून चित्रपट व्यवसाय नोएडात नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. हे योगी आदित्यनाथ यांना समजले आहे. मुंबई हा छोटा भारत आहे आणि संपूर्ण जगात भारताची ओळख निर्माण करतो आणि त्या बॉलिवूडला बदनाम करून योगी महाराज बॉलिवूडला युपीवूड बनवणार नाहीत हे समजते. मी क्रांती रेडकरताईंना सांगू इच्छितो की, तुम्ही पत्र लिहिलंय पण पापापुढे जात धर्म येत नाही, असे मलिक म्हणाले.