मुंबई : मुंबईतून नामांकीत कंपन्यांची सुमारे दीड कोटींची बनावट घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक चारच्या पथकानं ही कारवाई केली आहे. शेख मेनन स्ट्रिटवरील रियल टाईम शॉप येथून सुमारे १८०० घड्याळं तर डिवाईन कलेक्शन शॉपमधून तब्बल साडेसहा हजार बनावट घड्याळं पोलिसांनी जप्त केली आहेत. युनिट चारचे पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी या कारवाईत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांना २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. याआधी नामांकित कंपनीच्या बनावट घड्याळांची निर्मिती करणाऱ्या पायधुनी येथील कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी देखील विविध कंपन्यांची तब्बल एक कोटींची बनावट घड्याळं पोलिसांनी जप्त केली होती.
नामाकिंत कंपन्यांची बनावट घड्याळे मुंबईसह महाराष्ट्रात विकली जातात. त्यामुळे घड्याळ घेतांना तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या.