Anant Ambani Radhika Merchant Engagement VIDEO : लेकाच्या साखरपुड्यात मुकेश अंबानींच्या एका कृतीनं जिंकली मनं

Anant Ambani Radhika Merchant Engagement VIDEO : आपल्यासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी महत्त्वं दिलं, मग ते माध्यमांचे प्रतिनिधी का असेना... पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ... 

Updated: Jan 20, 2023, 09:11 AM IST
Anant Ambani Radhika Merchant Engagement VIDEO : लेकाच्या साखरपुड्यात मुकेश अंबानींच्या एका कृतीनं जिंकली मनं  title=
Mukesh Ambani wins hearts Anant Ambani Radhika Merchant Engagement VIDEO

Anant Ambani Radhika Merchant Engagement VIDEO : देशाच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गेली कित्येक वर्ष अग्रस्थानी असणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरात सध्या शुभकार्यांची रांग लागली आहे. काही दिवसांपूर्वीच धाकटा मुलचा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani Radhika Merchant roka) याच्या रोका समारंभानंतर आता मुंबईतील अँटिलिया या त्यांच्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीनं अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा (Anant Ambani Radhika Merchant Engagement ) सोहळा पार पडला. अनेक पुरोहितांच्या उपस्थितीत सर्व विधी संपन्न झाले आणि पुन्हा एकदा अंबानी कुटुंबावर सर्वांनीच शुभेच्छांचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळालं. 

कुटुंबीय, मित्रपरिवार आणि काही खास व्यक्तींच्या उपस्थितीत मुकेश अंबानी यांच्या लेकानं आणि होणाऱ्या सुनेनं आयुष्यातील एका नव्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश केला. यावेळी अनंतनं रॉयल ब्लू रंगाच्या आऊटफिटला पसंती दिली होती, तर राधिकानं सोनेरी रंगाचा लेहंगा घातला होता (Anant Ambani Radhika Merchant Engagement outfits). ज्यामध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. 

अनंत आणि राधिकाच्या या साखरपुड्यादरम्यान, खुद्द मुकेश अंबानी अनेक गोष्टींमध्ये लक्ष घालताना दिसले. मग तो होणाऱ्या सुनेचा प्रवेश असो किंवा आणखी काही. घरात आलेल्या या नव्या पाहुणीला त्यांनी मोठा आधार दिला. अंबानी कुटुंबात इतका मोठा समारंभ आहे, म्हटल्यावर तिथं माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी आलीच. 

मुकेश अंबानी यांच्या एका कृतीनं जिंकली सर्वांची मनं... 

मुकेश अंबानी यांच्याकडे पाहताना अनेकांनाच हा माणूस आपल्यातलाच आहे असं वाटतं. त्यांचं साधं राहणीमान अनेकांनाच भावतं. अशा या राजामाणसानं पुन्हा एकदा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि काही घटकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केल्याचं यावेळीसुद्धा पाहायला मिळालं. 

सोशल मीडियावर अनंत आणि राधिका यांच्या साखरपुडा सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले (Anant Ambani Radhika Merchant Engagement photos And video). त्यातल्याच एका व्हिडीओला प्रचंड Views मिळाले. कारण ठरलं, मुकेश अंबानी. माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर फोटो काढण्यासाठी म्हणून संपूर्ण अंबानी कुटुंब उभं राहिलं. यामध्ये ईशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामलही (Isha Ambani anand piramal) होता.

हेसुद्धा पाहा : VIDEO : अनंत अंबानी-राधिकाच्या साखरपुड्यासाठी अवतरली मायानगरी, आर्यन खानपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत अनेक सेलिब्रिटीची मांदियाळी

फोटो काढून झाल्यानंतर सर्वजण आत जाण्यासाठी निघाले. तितक्यातच व्हिडीओमध्ये दिसल्यानुसार मुकेश अंबानी यांनी राधिका आणि अनंतला परत जाऊन माध्यमांसाठी फोटो देण्यास सांगितलं. एका बाजूला उभे राहून ते कौतुकानं हे सर्व पाहत होते. यावेळी एका व्यावसायिकापेक्षा एका वडिलांच्या त्यांच्या रुपानं अनेकांनाच भारावल्यासारखं वाटलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

आपल्या कुटुंबाप्रती इतकं प्रेम असणाऱ्यांप्रती, आपल्या कुटुंबासाठी इथवर आलेल्यांप्रती अंबानी कुटुंबातील प्रत्येकानंच कतज्ञता व्यक्त केली. पण, त्यातही मुकेश अंबानी यांचं वेगळेपण सर्वांचीच मनं जिंकून गेलं.