कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: नगर पथविक्रेते (Hawker) अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. ‘कोविड- १९’ (साथीचा रोग) असल्यामुळे टाळेबंदीमध्यें (Lockdown) पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र शासन पुरस्कृत ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ (PM SAVNIDHI) अंतर्गत पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म - पतपुरवठा सुविधा योजनेची बृहन्मुंबईत अंमलबजावणी करण्यात येत आहे. ही योजना २४ मार्च २०२० रोजी व त्यापूर्वीच्या पथविक्रेत्यांसाठी संबंधित अटी व नियमांसापेक्ष लागू आहे.
योजनेची उद्दिष्टे
* पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून खेळते भांडवल रु. १०,०००/- कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देणे.
* नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे.
* डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे.
तपशील
* नागरी पथविक्रेते १ वर्षाच्या परतफेड मुदतीसह रु. १०,०००/- पर्यंतचे खेळे भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परत फेड करण्यास पात्र असतील.
* सदर कर्जावर प्रचलित दराप्रमाणे व्याज दर लागू राहतील.
* विहित कालावधीमध्ये कर्ज परतफेड केल्यास ७% व्याज अनुदान मिळण्यास पात्र.
* या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पथविक्रेत्यांनी http://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.
* अर्ज करण्यापूर्वी पथविक्रेत्यांच्या आधार कार्डाची त्यांच्या मोबाईल क्रमांशी जोडणी असणे आवश्यक आहे.
* ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी पथविक्रेत्यांनी लाभार्थी निकष पूर्ण करीत असल्याबाबतची कागदपत्रे तयार ठेवावीत. उदा. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, विक्री प्रमाणपत्र/पथविक्रेता सर्वेक्षणाचा एस.आर.व्ही क्रमांक, बॅंकेचे पासबुक, पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस (असल्यास), पासपोर्ट आकाराचे छायाचित्र इत्यादी
* अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पथविक्रेत्यांने अर्ज क्रमांक माहितीसाठी जतन करुन ठेवावा. पथविक्रेत्याला लघुसंदेशांद्वारे अर्जाच्या स्थितीची माहिती वेळोवेळी प्राप्त होईल.