आम्ही असल्या धमक्यांना भीक घालत नाही, मनसेचा शिवसेनाला इशारा

जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे लाथ मरणारच

Updated: Jun 29, 2020, 03:59 PM IST
आम्ही असल्या धमक्यांना भीक घालत नाही, मनसेचा शिवसेनाला इशारा  title=

मुंबई : मनसे आणि शिवसेना यांच्यातील आणखी एक वाद समोर आला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवसेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या पत्रकार परिषदेत वरूण सरदेसाई यांचं देखील नाव घेतलं होतं. यावर आता वरूण सरदेसाईंनी संदीप देशपांडेंना मानहानीची नोटीस पाठवली आहे. 

युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांच्याकडून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना नोटीस  पाठवण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांनी मानहानी संदर्भात वकीला मार्फत संदीप देशपांडे यांना नोटीसपाठवली आहे. 

संदीप देशपांडे यांनी कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या साधन सामुग्री मध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप केला होता. या भ्रष्टाचारा मागे पेंग्विन गॅंग असल्याचा देखील त्यांनी आरोप केला होता. पत्रकार परिषदेत वरून सरदेसाई यांचे नाव घेतले होते. युवा सेना प्रमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरून सरदेसाई आहेत.

वरूण सरदेसाई यांनी नोटीस पाठवल्यानंतर असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे लाथ मरणारच असं मनसे,सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. संदीप देशपांडे  पुढे म्हणाले की, वरूण सरदेसाई यांनी पाठवलेल्या नोटीसला आम्ही भीक घालत नाही. नोटीस पाठवून त्यांनी सिद्ध केले हे पेंग्विन गॅंगचे सदस्य आहेत. 

खालून असो की वरुण आम्ही कोणाला घाबरत नाही. मुख्यमंत्री स्वतः गोंधळले आहेत काय सुरू करायचा आणि काय नाही यावर  त्यांनी ठरवाव काय त्यांना सांगायच आहे. या गोंधळाचा फटका सर्वसामान्य यांना बसतोय.