दादरमध्ये कॉंंग्रेस आणि मनसे कार्यकर्ते भिडले

कॉंग्रेसने मुंबईत फेरीवाल्यांच्या सन्मानार्थ मूक मोर्चा आयोजित केला होता. 

Updated: Nov 1, 2017, 11:44 AM IST
दादरमध्ये कॉंंग्रेस आणि मनसे कार्यकर्ते भिडले  title=

मुंबई : कॉंग्रेसने मुंबईत फेरीवाल्यांच्या सन्मानार्थ मूक मोर्चा आयोजित केला होता. पण या मूक मोर्च्याचे स्वरूप आता बदलले आहे. दादरमध्ये नक्षत्र मॉलजवळ कॉंग्रेस आणि मनसे कार्यकर्ते एकामेकांसमोर भिडले आहेत. 

कॉंग्रेसच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी देऊ नये, अन्यथा काही अनुचित घटना घडल्यास मनसे जबाबदार राहणार नाही, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी हाणामारी करायला सुरूवात केली आहे. 

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. काही कार्यकर्त्यांना पकडले आहे. पोलिसांनी तत्परतेने सारी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. त्यानंतर काही काळ मूक मोर्चा करणारे कॉंग्रेसचे कार्यकर्ते ठिय्या ठोकून बसले होते.  

संजय निरूपम मात्र कॉंग्रेसच्या फेरिवाला सन्मानार्थ मूक मोर्च्यामध्ये सहभागी नव्हते. तसेच आयत्या वेळेस या नियोजित मोर्च्याचे स्थान बदलण्यात आले. त्यामुळे कॉंग्रेसचा हा मोर्चा फसल्याचे बोलले जात आहे.