MHADA ची लवकरच खूशखबर, मुंबईसह या शहरात बांधणार घरं

म्हाडा लवकरच नवीन घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर देणार आहे. म्हाडाकडून विविध शहरात घरं बांधली जाणार आहेत.

Updated: Apr 1, 2022, 08:51 PM IST
MHADA ची लवकरच खूशखबर, मुंबईसह या शहरात बांधणार घरं title=

Mhada Housing lottery : घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक खूषखबर आहे. राज्यात म्हाडातर्फे येत्या वर्षभरात 15 हजार 781 घरं बांधण्याचं नियोजन आहे. यापैकी मुंबईत 4 हजार 623 घरं उभारली जाणार आहेत. मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकणामध्येही Mhada ची घरं बांधली जाणार आहेत. 

2022-23 वर्षासाठी म्हाडाच्या 10 हजार 764 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मान्यता मिळाली आहे.

म्हाडा कोणत्या विभागात किती घरं बांधणार

मुंबई - 4,623 सदनिका

बीडीडी चाळींची पुनर्विकास योजना - 2132.34 कोटी रुपये
अँटॉप हिल वडाळा येथील योजना - 29 कोटी रुपये
बॉम्बे डाईंग मिल वडाळा योजना - 64 कोटी रुपये
कोपरी पवई येथील योजना - 145.54 कोटी रुपये
मागाठाणे बोरिवली येथील योजना - 50 कोटी रुपये, 
खडकपाडा दिंडोशी येथील योजना - 15 कोटी रुपये
पहाडी गोरेगाव येथील योजना - 250 कोटी

कोकण मंडळ - 7 हजार 592 सदनिका

वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद

पुणे - 1,253 सदनिका

धानोरी येथे भूसंपादन आणि भूविकासासाठी 380 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  

नागपूर मंडळ 195 घरं बांधणार आहे. औरंगाबाद मंडळाचं 1 हजार 762 घरबांधणीचं उद्दीष्ट आहे. तर नाशिक मंडळ 220 आणि अमरावती मंडळ 136 घरं बांधण्याचं प्रस्तावित आहे.