मुंबईत MHADA चं घर हवंय? 'या' भूखंडावर उभारली जाणार सामान्यांना परवडणारी 2500 घरं, कधी निघणार लॉटरी?

MHADA Homes : मुंबईत म्हाडाचं घर मिळावं यासाठी अनेक इच्छुक दरवर्षी सोडतीसाठी अर्ज करतात. तुम्हीही म्हाडाच्या घराच्या शोधात आहात का?   

सायली पाटील | Updated: Dec 13, 2024, 10:20 AM IST
मुंबईत MHADA चं घर हवंय? 'या' भूखंडावर उभारली जाणार सामान्यांना परवडणारी 2500 घरं, कधी निघणार लॉटरी? title=
Mhada to make 2500 homes in patrachawl till 2027 latest news

MHADA Homes : मुंबई शहरामध्ये हक्काचं घर असावं हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि या प्रयत्नांमध्ये मोठी मदत होते ती म्हणजे म्हाडाची. गृहनिर्माण क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या म्हाडानं आतापर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांतील बहुतांश भूखंडांवर म्हाडाच्या वसाहती, सदनिका उभारत शहरातील नागरिकांना खिशाला परवडेल अशा दरात घरं उपलब्ध करून दिली. यातच आता आणखी 2500 घरांची भर पडणार आहे. (MHADA Lottery 2027)

म्हाडाच्या एका सोडतीची चर्चा थांबत नाही तोच नव्यानं तयार होणाऱ्या घरांसंदर्भातील माहितीसुद्धा समोर आली आहे. जिथं म्हाडा पत्राचाळ भूखंडावर अडीच हजार घरं बांधणार असून, 2027 पर्यंत हे उद्दीष्ट साध्य होणार असल्याचं सांगितलं जात आहे. (MHADA Goregaon) म्हाडाकडून गोरेगाव पत्राचाळ क्षेत्रामध्ये तब्बल 2398 घरं उभारणार असून, त्यासाठी तीन विकासकांनावर कामाची जबबादारी देण्यात आली आहे. 

पत्राचाळ भूखंडावर तयार होणाऱ्या या घरांची विक्री सोडतीच्या माध्यमातून केली जाणार असून, त्यामुळं मुंबईच्या परिघामध्ये स्वत:च्या घरांसाठी प्रयत्नांत असणाऱ्याना या योजनेचा लाभ घेणार आहे. इथं तयार होणाऱ्या घरांची एकूण संख्या पाहता एकाच ठिकाणी अधिकाधिक घरं असणारा हा म्हाडाचा एक मोठा प्रकल्प ठरणार आहे. 

हेसुद्धा वाचा : ...तरच तुमचा अर्ज पात्र; CIDCO Lottery संदर्भात मोठी अपडेट

2027 मध्ये या प्रकल्पातील घरांसाठीची सोडत निघणार असून, यामध्ये अल्प गटासाठी 1023, मध्यम गटासाठी 1242 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 133 घरं उपलब्ध असतील. गोरेगाव पत्राचाळ इथं पाच भूखंड असून त्यामधील आर-1, आर-7, आर-4 आणि आर-13 या भूखंडांवरील घरांच्या निर्मितीसाठी विकासकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.