Mhada Lottery 2023 : म्हाडा सोडत कधी जाहीर होते आणि आम्ही त्या सोडतीसाठी नेमके कधी अर्ज करतो याचीच उत्सुकता अनेक सर्वसामान्यांना लागलेली असते. अशा सर्वांसाठीच आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा, कारण म्हाडाच्या घरांसाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आज (गुरुवारपासून) सुरु झाली आहे. इतकंच नव्हे तर, पुणे मंडळाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेलाही आजपासून सुरूवात होत आहे.
यावेळी म्हाडानं ही प्रक्रिया अतिशय सोपी केली असून, तुम्ही एकाच नोंदणीतून म्हाडाच्या कोणत्याही मंडळातील घरासाठी (dream home) अर्ज करू शकता. यामध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि सोडतीआधीच तुमच्या सर्व कागदपत्रांची छाननी होणार असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उत्पन्न गट अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे. कारण, म्हाडाच्या घरांसाठी यापुढे अल्प उत्पन्न गटातील इच्छुकांना मध्यम आणि उच्च गटातील घरांसाठी अर्ज करता येणार आहे. थोडक्यात यापुढील सोडतीसाठी नवी उत्पन्नमर्यादा निर्धारित करण्यात आली आहे (Mhada lottery income belt).
2022 मध्ये करण्यात आलेल्या बदलानुसार (वार्षिक) उत्पन्नाची अट....
अत्यल्प गट - वार्षिक 6 लाख रुपये (प्रति महिना 50 हजार रुपये)
अल्प गट - वार्षिक 6 लाख 1 रुपये ते 9 लाख 1 रुपये
मध्यम गट - वार्षिक 9 लाख 1 रुपये ते 12 लाख 1 रुपये
उच्च गट- वार्षिक 12 लाख 1 रुपये ते 18 लाख 1 रुपये
म्हाडाकडून देण्यात आलेली उत्पन्नमर्यादा (mhada mumbai home) मुंबई महानगर, पुणे (mhada pune) महानगर प्रदेश, आणि 10 लाखांहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लागू असेल. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील सोडतींसाठी उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे....
अत्यल्प गट - वार्षिक 4 लाख 50 हजार रुपये
अल्प गट - वार्षिक 4,50,001 रुपये ते 7 लाख 50 हजार रुपये
मध्यम गट - वार्षिक 7,50,001 रुपये ते 12,00,000 रुपये
उच्च गट - वार्षिक 12,00,001 रुपये ते 18,00,000 रुपये
लवकरात लवकर मिळणार घराचा ताबा
म्हाडाच्या घरासाठी अर्जनोंदणी केल्यानंतर जर तुम्ही सोडत जिंकलात तर कमीत कमी वेळात तुम्हाला घराचा ताबा आता मिळणं शक्य होणार आहे. वेळखाऊ प्रक्रियेतून सुटका होणार असल्यामुळं अनेकांसाठी ही दिलासादायक बाब असणार आहे. सोडतीआधी तुम्ही फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा आणि निवासाचा दाखलाही सादर करणं अपेक्षित असेल.