MHADA Lottery 2023 : तुम्ही म्हाडाचे घर घेण्याचा विचार करत असाल तर जास्तीचे पैसे जमा करावे लागणार आहेत. कारण अनामत रकमेत वाढ होणार आहे. अत्यल्प गटासाठी 25 हजार तर अल्प गटासाठी 50 हजार रुपये अनामत रक्कम प्रस्तावित आहे. यासंबंधिचा प्रस्ताव लवकरच म्हाडा उपाध्यक्षांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अनामत रकमेत वाढ होणार हे निश्चित आहे.
म्हाडाकडून स्वस्त घरे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. मात्र, आता अनामत रकमेत वाढ होणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सर्व नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. उत्पन्न गटांवर आधारित , राज्य सरकार लॉटरी प्रणाली आयोजित करते. हे गट EWS, LIG, MIG आणि HIG मध्ये विभागलेले आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2023 च्या सोडतीसाठी अत्यल्प आणि अल्प गटातील अनामत रक्कमेत कोणतीही वाढ करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आता मात्र, मंडळाने घुमजाव करीत अत्यल्प आणि अल्पसह सर्वच उत्पन्न गटाच्या अनामत रकमेत भरमसाठ वाढ प्रस्तावित केली आहे. त्यानुसार अत्यल्प गटासाठी 25 हजार रुपये, अल्प गटासाठी 50 हजार रुपये, मध्यम गटासाठी एक लाख रुपये आणि उच्च गटासाठी दीड लाख रुपये अशी अनामत रक्कम प्रस्तावित केली आहे. यासंबंधिचा प्रस्ताव लवकरच म्हाडा उपाध्यक्षांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत बदल करण्यात आला असून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. तर नव्या प्रक्रियेसह सोडत काढताना पुणे आणि कोकण मंडळाने अनामत रक्कमेत वाढ केली आहे.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि अनावश्यक अर्ज फिल्टर करण्यासाठी बयाणा रक्कम अर्थात अनामत रकम वाढवण्याचा प्राधिकरणाचा विचार आहे. हे प्रकल्प खुल्या बाजारातील प्रकल्पांपेक्षा अधिक परवडणारे असल्याने , अर्जदार अनेकदा त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने अनेक वेळा अर्ज करतात, त्यामुळे खऱ्या खरेदीदारांना संधी कमी मिळते. शिवाय, अशी अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तसेच जेव्हा म्हाडाच्या फ्लॅटचे विजेते त्यांचे फ्लॅट जास्त नफ्यात विकतात, याला आला घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हाडाकडून सांगण्यात येत आहे.
म्हाडा पाच ते 10 टक्क्यांनी अनामत रकमेत वाढवण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावावर गृहनिर्माण प्राधिकरण चर्चा करुन तो मंजूर करण्याच्या तयारीत आहे. या मसुदा एकदा अंतिम झाल्यानंतर, मध्यम-उत्पन्न गट (MIG) आणि उच्च-उत्पन्न गट (HIG) युनिट्ससाठी टोकन मनी सुमारे 10 टक्के वाढविली जाणार आहे.