Good News : मुंबईत म्हाडाच्या १३८५ घरांची लॉटरी, भरा ऑनलाईन अर्ज

मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज म्हाडाच्या १३८५ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. 

Updated: Nov 3, 2018, 06:44 PM IST
Good News :  मुंबईत म्हाडाच्या  १३८५ घरांची लॉटरी, भरा ऑनलाईन अर्ज title=

मुंबई : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज म्हाडाच्या १३८५ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. पुढील महिन्यात अर्थात १६ डिसेंबरला या लॉटरीचा निकाल लागणार आहे. यासाठी ५ नोव्हेंबरपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. 

म्हाडाच्या अत्यल्प प्रवर्गासाठी घराची किंमत २० लाख रुपये किंमत आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी २० लाख ते ३५ लाख, 
मध्यम उत्पन्न गटासाठी ३५ लाख ते ६० लाख आणि उच्च उत्पन्न असलेल्यांसाठी घराची किंमत ६० लाखांपेक्षा जास्त आहे. म्हाडाचे सर्वात कमी किंमतीचे घर १४ लाख ६२ हजारापर्यंत आहे. तर उच्च उत्पन्न गटातील धवलगिरी कंबाला हिल येथील घराची किंमत सर्वाधिक ५ कोटी ८० लाखांच्या घरात आहे.

घरांसाठी उत्पन्नाची मर्यादा 

- अत्यल्प प्रवर्ग उत्पन्न मर्यादा : २५००० 

- अल्प उत्पन्न - २५ ते ५० हजार 

- मध्यम उत्पन्न - ५० ते ७५ हजार प्रति महिना