नवी दिल्ली : मुंबई सुरु असलेल्या 'भारत डायमंड वीक' (Bharat Diamond Week)मध्ये येणाऱ्यांना पाच कोटींची कार आणि खूप सारे गिफ्ट्स मिळण्याची शक्यता आहे. यावेळेस डायमंड वीकमध्ये मर्सिडीज एस क्लास (S Class) कारला ३.५ लाख सीझेड डायमंड लावण्यात आले आहेत. याआधी दुबईमध्ये एका कारला २.५ लाख डायमंड लावण्यात आले होते. आज लक्ष्मी डायमंडने हा रेकॉर्ड बनवला होता. या कारचे अनेक फिचर्स आहेत. या कारची किंमत ५ कोटी रुपये इतकी आहे.
५० कोटींची खरेदी करणाऱ्यांना ही कार मोफत मिळणार आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद होणार आहे. डायमंड इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी हिरे व्यापाऱ्यांनी ही योजना आखली आहे. अर्थव्यवस्था ढासळली असताना डायमंड इंडस्ट्रीमध्ये देखील विक्री मंदावली आहे.