रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक 

Updated: Jan 21, 2018, 10:03 AM IST
रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक  title=

मुंबई : रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. 

मध्य रेल्वेवर

 मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन स्लो मार्गावर सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आलीये.. 

 हार्बर मार्गावर

 हार्बर मार्गावर पनवेल ते नेरुळदरम्यान अप आणि डाऊन दोन्हा मार्गांवर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलाय. या दरम्यान ट्रान्स हार्बरवरील पनवेसाठी जाणारी सेवा बंद असेल.

 प.रेल्वे मार्गावर 

 तर प.रे.वरही अंधेरी तेर बोरीवली दरम्यान डाऊन फास्ट मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळे अंधेरी ते बोरीवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावरुन चालवण्यात येतील.